जुलै-2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

आपल्या संस्थेच्या, कै.ग.सु.वराडे, आय.टी.आय. मुक्त़ाईनगर या शाखेतील अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा, जुलै-2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पदवीदान समारंभ आज दि.20/09/2023 रोजी आयोजित करण्यात आलेला होता. समारंभास संस्था व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन, सौ.रोहिणीताई खडसे-खेवलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणुन जळगांव येथील उद्योजक श्री.अरुण बोरोले व श्री.चंद्रकांत बेंडाळे उपस्थित होते.​

जुलै-2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा Read More »